करियर मार्गदर्शन व पोक्सो एक्ट कायदा या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न
शनिवार, सप्टेंबर १४, २०२४
चंद्रपूर:- दिलासाग्राम संस्था बल्लारपूर व अंबुजा फाउंडेशन उपरवाही यांच्या सयुक्त विद्यमाने साईबाबा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव इथे दिनांक 12/9/2024 ला युथ करिअर गायडन्स व पोक्सो ( ऍक्ट ) कायदा याबदल एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले , कार्यक्रमाचे अधक्ष्य साईबाई कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य लोहे सर , तर प्रमूख पाहुणे प्राध्यापक नडे सर , प्राध्यापिका पाचघरे मॅडम , दीलासाग्राम संस्थेचे अधिकारी नीलकंठ सरवर, रजनीकांत चांदेकर , किरण मॅडम, तसेच अंबुजा फाउंडेशन उपरवाही चे मान. प्रणिता मॅडम हे उपस्थित होते तर आजचा प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक मान. बाबिलवार सर अंबुजा फाउंडेशन उपरवाही हे होते , प्रशिक्षना मद्ये आलेल्या प्रमूख पाहुणे यांचे स्वागत करून क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षणाची सुर्वात करण्यात आली . प्रशिक्षणामद्ये मुलां-मुलींचे वेग-वेगळे पाच ग्रुप तयार करून आपण करिअर मद्ये काय बनार आहोत याबद्दल चार्ट पेपर मद्ये लिवण्यास सांगितले , लीवलेल्या चार्ट पेपर मधील मुलांना करीयर मद्ये सक्सेस होण्यास आपल्या परिस्थितीला मात करून आकाश्याला गवसणी घालवी तरच ठरवलेल्या धेयापर्यंत सक्सेस व्हाल, मुली-मुलामद्ये मैत्री-भावाचे संबध ठेवावे अन्यथा वाईट होणारे कृत्य मद्ये पोक्सो एक्ट कायद्या सारख्या गुण्याला मुखाव लागते व कायद्याने लावलेल्या बंधनात जेल सुधा होऊन करीयर होता होता आऊष्याला फुल स्टॉप लागायला वेळ लागत नाही अश्या प्रकारे खेडी माडीच्या माध्यमातुन मार्गदर्शन देण्यात आले , तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विध्यार्थीनी आशा भलवे तर प्रास्ताविक प्राचार्य लोहे सर व आभार नडे सर यांनी केले . तर दिलासाग्राम संस्थेचे कार्य संचालिका सिस्टर जया व दिलासा बालभवन चे संचालिका सिस्टर विवीयाना यांच्या मार्गदर्शना खाली हे कार्यक्रम होत आहेत ....
Tags