मोकाट कुत्र्यांची झुंडशाही; नागरीकांत दहशत #Chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जिल्हात दररोज कुठे ना कुठे पिसाळलेल्या कुत्र्यानी चाव घेतल्याचा प्रसार माध्यमातून बातम्या येत असतात. शहर व जिल्ह्यातील या भटक्या कुत्र्यांचा उच्छादामुळे नागरीक भीतीचा छायेखाली असतात. त्याची परवा संबंधित विभागाला आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. भटक्या कुत्र्यांची ची समस्या ईतकी गंभीर अजूनही कायमस्वरुपी इलाज करण्याचा प्रयत्न आजपर्यंत झालेला नाही. नागरीकांना रात्री शहरात जीव मुठीत धरूनच फिरावे लागते. कारण मुख्य चौकातली विशेषतः चिकन, मटन, अशा काही दुकाने जिथे आहेत. त्या परिसरात ही कुत्री टोळीने असतात.

असाच प्रकार भद्रावती शहरात पुन्हा पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी हौदोस घालण्यात सुरूवात केली. आहे दिवस असो रात्र जागोजागी ठाण मांडून बसलेल्या या कुत्र्यांचा जवळून चालत अथवा दुचाकी वरून जाताना जीव मुठीत घेऊनच ये-जा करवी लागते. केव्हा ही भटके कुत्रे मागे धावनार दुचाकीस्वारला खाली पाडनार चावा घेनार याचा नेम नसतो. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मुख्य गल्ली बोळात ही कुत्रे टोळीने वावर असल्याने अशा भटक्या कुत्र्यांचा विषय गंभीर बनला आहे.

या दरम्यान गेल्या काही वर्षांपासून नसबंदी नाही मोकाट कुत्र्यांना आवर घालण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याला किंवा त्यांना ठार मारण्याला कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे अशा कुत्र्यांची नसबंदी करुन त्यांचे प्रजोत्पादन होवू नये हाच एकमेव उपाय आहे. पण हा खर्चिक असल्याने त्याचा अवलंब केला जात असल्याने अपवादाने दिसत आहे. सबंधित विभागाने शहरातील अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.