गोसीखुर्द धरणाचे 33 गेट उघडले
भंडारा:- भंडारा जिल्ह्याला काल रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर भंडारा गोंदिया जिल्ह्यात ढग फुटी सदृश्य पाऊस बरसला. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहू लागले. अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला. तर जिल्ह्यातील जीवनदायी समजली जाणारी वैनगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे 27 गेट दीड मीटरने तर 6 गेट एक मीटरने उघडण्यात आली आहेत. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.