"या" मतदारसंघात कुणबी समाजातील व्यक्तीला तिकीट द्यावे, यासाठी गळ घालणार:- आ. परिणय फुके #Chandrapur #brahmapuri

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे विजय वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे समाज बांधवांना अप्रत्यक्ष आवाहन केले आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात आज कुणबी समाजाचे महाअधिवेशन होते. या अधिवेशनात बोलताना भाजप आमदार परिणय फुके यांनी आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना ब्रम्हपुरी मतदारसंघातून कुणबी समाजातील व्यक्तीला तिकीट द्यावे, यासाठी गळ घालणार असल्याचं वक्तव्य केलं. फुके यांच्या याच मागणीचा धागा पकडून धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांना पराभूत करण्याचे आवाहन केले.