मुल:- मी सत्तेत नसल्यामुळे माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी काहीही नसतांना तुम्ही माझ्या सोबत येत आहात. प्रवाहाच्या विरूध्द जात आपण मला दिलेली साथ ही उभारी देणारी असल्याचे जुनासुर्ला गावात झालेल्या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी व्यक्त केले.
मुल तालुक्यात अतिशय उत्तम असा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळत आहे ठिकठिकाणी औक्षण झाल्यानंतर गावातील आबालवृध्दांशी संवाद साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संकल्पना समजावून सांगतांनाच त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. यात प्रामुख्याने ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची वानवा असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. यावर आपण निवडून आल्यानंतर या समस्या सोडविण्याची ग्वाही संदिपभाऊ गिऱ्हे यांनी ग्रामस्थांना दिली. गावातील जेष्ठ नेते माजी पंचायत समिती उपासभाती वासुदेव समर्थ यांच्या निवास्थानी भेट देत आशीर्वाद घेताला.
यावेळी मुल तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राज ठाकरे,बंडू वरगंटिवार,क्रिष्णा चिमलवार,गंगाधर इद्दुरवार, खुशाल उपरीकर,मारोती मोटघरे,सुरज उपरीकर,सुधाकर उपरीकर, रोहित उपरीकर, दिलीप शेंडे,शंतूनु वरगंटिवार, अरविंद सिडाम, विलास बावणे, प्रकाश कन्नाके,शशिकांत बोथरे,सुरज भोयर, सचिन कामडी, यशवंत इनमुलवार आदी आदी उपस्थित होते.