Stray Dogs: जंतू पडलेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

Bhairav Diwase
पोंभूर्णा:- शहरातील शास्त्री नगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस माजविला आहे. वार्ड वासियांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अश्या मोकाट कुत्र्यांच्या शरीरावर चर्म रोग झाले, जखमींमध्ये जंतू पसरले आहे. वार्डात लहान मुलं खेळत असतात अश्या ठिकाणी सुद्धा कुत्र्यांचा वावर आहे त्यामुळे लहान मुलांना चर्मरोग सारखा आजार होण्याची भिती पालकांना सतावत आहे. त्यामुळे नगरपंचायतने जंतू पडलेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्रस्त पोंभूर्णाकरांनी केली आहे.

शहरातील शास्त्री नगर परिसरातील प्रभाग क्र.१५, १६, १७ मध्ये भटक्या कुत्र्यांने हैदोस माजविला आहे. मोकाट कुत्र्यांना चर्मरोग झाले असून, झालेल्या जखमांमध्ये जंतू पसरले आहे. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात आहे. वार्डात लहान मुले खेळत असतात. विद्यार्थी पायी किंवा सायकलने शाळेत ये-जा करतात अश्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आहे. अनेकदा शाळकरी विद्यार्थ्यांचा कुत्र्यांकडून पाठलाग केला जात असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यासोबतच लहान मुलांना चर्मरोग सारखा आजार होण्याची भिती व कुत्रे चावा घेऊन जखमी करण्याची भिती नागरिकांना वाटत आहे. रात्री उशिरा येणाऱ्या नागरिकांना सुद्धा कुत्रे लक्ष्य करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. भटक्या कुत्र्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी नगरपंचायतकडे केली आहे.नगरपंचायत प्रशासनाकडून कुत्रे पकडणे आणि निर्बिजीकरण करण्यासाठीचे काम अजूनपर्यंत करण्यात आले नाही.त्यामुळेच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.
शास्त्री नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस आहे.कुत्र्यांना चर्मरोग आहे.जंतू पडले आहेत.यामुळे परिसरातील नागरिकांंना आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. नगरपंचायतने तत्काळ भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा.
दिनेश गिरसावळे, रहिवासी