गडचिरोली:- शेतामध्ये काम करत असताना महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. 20 सप्टेंबरला घडली. विजया गेडाम (वय.52) असे मृत महिलेचे नाव असून ती आरमोरी तालुक्यातील नरोटीमाल येथील रहिवाशी होती.
विजया गेडाम या शुक्रवारी (दि.20) डार्ली येथील आपल्या शेतावर गेल्या होत्या. परंतु दुपारी आकाशात ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. विजांपासून संरक्षण करण्यासाठी त्या जवळच्या नाग मंदिरात आश्रय घेण्यासाठी गेल्या. परंतु तेवढ्यात अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.