BJYM: भाजयुमो भद्रावती तालुका सचिव पदी कुलदीप नामदेव मन्ने यांची निवड

Bhairav Diwase
भद्रावती:- दि. १८ आक्टोबर रोजी भद्रावती तालुका भाजयुमो ची कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात भद्रावती तालुका सचिव पदी कुलदीप नामदेव मन्ने यांची निवड करण्यात आली.

दरम्यान ही निवड मा. सुधीर मुनगंटीवार (महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री तथा पालक मंत्री), मा. हंसराज अहिर (राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री भारत सरकार), श्री. हरीश शर्मा (भाजपा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष ग्रामीण), श्री. महेश देवकते (भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चंद्र ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनात
श्री. रमेश राजूरकर (वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख) व भाजयुमो तालुका अध्यक्ष श्री. सूरज चौधरी यांच्या उपस्थितीत ही निवड करून श्री. कुलदीप नामदेव मन्ने यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. नवनिर्वाचित पदाधिकारी श्री. कुलदीप नामदेव मन्ने सर्व भाजपा आणि भाजयुमो पदाधिकारी चे आभार व्यक्त केले.