राजुरा:- कोरपना येथील ११ वर्षीय शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार करणारा नराधम अमोल लोडे हा कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे. गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासवण्याचं काम करणाऱ्या या नराधमाने मुलीसमान छोट्या विद्यार्थींवर मागील अनेक महिन्यांपासून गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. त्याची ही विकृती म्हणजे नीच मानसिकतेचा कळस आहे. अशा या नराधमाला त्याला पाठीशी घालणारे आणि या निर्दयी घटनेवर मूग गिळून गप्प बसलेल्या कॉंग्रेसचे स्थानिक नेते म्हणजे नराधमांचे मावसभाऊ आहेत. त्यांची करावी तेवढी निंदा कमी आहे. असा घणाघात भाजपाचे विधानसभा निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांनी केला.
कोरपना येथील इमिनेन्स इंटरनॅशनल स्कुल या शाळेतील ११ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीवर कोरपना शहर युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शिक्षक अमोल लोडे या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजुरा येथे भव्य निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. लक्षणीय महिलांच्या उपस्थितीत शहरातील भवानी माता मंदिरापासून नाका नं. ०३ मार्गे गांधी चौक ते पोलिस ठाणे अशी भव्य निषेध रॅली काढून भाजपने बलात्कारी अमोल लोडे चा तिव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
पुढे बोलताना, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासून गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला गालबोट लावण्याचं पातक या अमोल लोडे नावाच्या नराधमाने केले. हा नराधम शहर कॉंग्रेसच्या युवक कमेटीचा अध्यक्ष आहे आणि आईबहिणींच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडविण्याचा कॉंग्रेसचा तसा जुणा डी.एन.ए. आहे. या प्रकरणातही या भागातील कॉंग्रेस नेत्यांनी पिडीतेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकला. सुताचा साप करणारे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खोट्या नरेटिव्हने जनतेची दिशाभूल करणाऱ्या क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर ह्या मात्र या गंभीर प्रकरणावर मुग गिळून गप्प आहेत. हे अतिशय निंदनीय असून यामुळे त्यांची दुट्टपी भुमिका आणि कॉंग्रेसी मानसिकता आता चव्हाट्यावर आली आहे.
या भागाचे आमदार सुभाष धोटे यांच्याही शिक्षण संस्थेत आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. ज्यामुळे आमदार सुभाष धोटे व त्यांचे बंधू माजी नगराध्यक्ष अरूण धोटे यांना जेलवारी घडली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानचा प्रचार अन् प्रसार कॉंग्रेसचे स्थानिक नेते अशा पद्धतीने करतात काय? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शहरातील चौकाचौकातून निषेध नोंदवत आलेल्या रॅलीची सांगता पोलीस ठाणे राजुरा येथे करण्यात आली असून; बलात्कारी अमोल लोडे ला फाशीची शिक्षा द्यावी तसेच त्याला मदत करणाऱ्या कॉंग्रेसी हस्तकांनाही शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने ठाणेदारांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या आंदोलनात माजी आमदार सुदर्शन निमकर, तालुकाध्यक्ष सुनिल उरकुडे, शहराध्यक्ष सुरेश रागीट, विनायक देशमुख, संजय उपगण्लावार, दिपक सातपुते, सतिश उपलंचेवार, दिलीप गिरसावळे, सतिश कोमरवेल्लीवार, बाळनाथ वडस्कर, मिलिंद देशकर, अनंता येरणे, सचिन डोहे, सिनू पांझा, नितीन वासाडे, राजु डोहे, सुरेश धोटे, सतीश धोटे, रावला रामास्वामी, जनार्धन निकोडे, अरूण डोहे, सईद कुरेशी, भाऊराव चंदनखेडे, शंकर मडावी, सिनु उत्नुरवार, सिनु मंथनवार, वामन तुराणकर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मायाताई धोटे, तालुका महामंत्री यशोधरा निरांजने, पौर्णिमा उरकुडे, गौरी सोनेकर, ममता केशट्टीवार, शितल वाटेकर, प्रिती रेकलवार, लक्ष्मी बिस्वास, ॲड. रजनी बोढे, शुभांगी रागीट, राधा विरमलवार, सिमा देशकर, सविता खनके, अश्विनी कोकोडे, अल्का जुलमे, अजय राठोड, राजेश वाटेकर, प्रफुल्ल घोटेकर, आकाश चिंचाळकर, प्रणय विरमलवार, राहुल सपाट, प्रदिप पाला, दिपक झाडे, हितेश गाडगे, सुनिल आत्राम, शंकर धनवलकर, अशोक झाडे, भाऊराव बोबडे, अर्जुन पायपरे, महादेव हिंगाणे, अमोल सोनेकर, सचिन भोयर, स्वप्निल राजुरकर, समीर बेदावार, अजय बांदूरकर, विशाल अहिरकर, स्वप्निल आस्वले, मंगल चव्हाण, निखिल भोंगळे, शिथील लोणारे, सौरभ मोरे, विनोद पाल, संजय समर्थ, सुरज हरीहर यांचेसह राजुरा शहर आणि तालुक्यातून महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.