Home Minister Devendra Fadnavis: चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्थानिक नेते वाचवताहेत का? गृहमंत्री फडणवीसांचे गंभीर आरोप

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला पळून जाण्यास स्थानिक नेत्यांनी मदत केल्याचा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. चंद्रपूरमध्ये एका शिक्षकाने विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी शिक्षक अमोल लोडे हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष असून त्याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "चंद्रपूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने आरोपीने अतिशय वाईट पद्धतीने मुलींचे शोषण केले आहे. तो फरार होता पण त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्याला कठीणात कठीण शिक्षा देण्यात येणार आहे. त्याला काही स्थानिक नेत्यांनी पळून जाण्यास मदत केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. परंतू, अशा प्रकरणात पक्ष वगैरे मी बघत नाही. आरोपी हा आरोपी असतो. त्यामुळे त्याच्यावर आणि त्याला मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच यामध्ये अधिकचे साक्षीदार आहेत का हेसुद्धा बघितले जाईल," असे ते म्हणाले.