छत्तीसगड:- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सध्या परिसरात चकमक सुरू असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. असे वृत्त ANI ने दिले.
दरम्यान, नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिस घटनास्थळी दाखल झाली आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून शस्त्रे-दारुगोळा जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायणपूर-दंतेवाडा सीमेवर माड भागात नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून नारायणपूर पोलिस आणि दंतेवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली. यावेळी चकमक झाली आणि त्यात 30 नक्षलवादी ठार झाले. दंतेवाडाचे एसपी गौरव राय यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.