चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा हा कॉग्रेस चा बालेकिल्ला असून काही चुकांमूळे मागील काही वर्षांपासून चंद्रपूर विधानसभेत आमदार निवडून येत नव्हता. परंतू यावेळी चंद्रपूर विधानसभेसह लोकसभा क्षेत्रातील सर्वच आमदार निवडून आणणार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सुधाकर अंभोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले.
येत्या काही दिवसांत विधानसभेच्या निवडणूका होणार असून प्रत्येका ला तिकीट मागण्याचा अधिकार असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त करीत प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षा शी प्रामाणिक राहून काम केल्यास विजय सोपा होतो, असे प्रतिपादन केले. तसेच पक्षश्रेष्ठी ज्याला कोणाला संधी देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे मत देखील यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
श्री. सुधाकर अंभोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दि. 07 ऑक्टोंबर रोजी पार पडला. यावेळी भाजपा च्या माजी नगरसेविका खुशबू चौधरी यांनी खासदार प्रतिभा धानोरकर व आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकतयंपक्ष प्रवेश केला. यावेळी सुभाष धोटे म्हणाले कि, काँग्रेस पक्ष हा सर्व सामान्यांचा पक्ष असून येथे सर्वांना न्याय मिळत असतो. यावेळी मंचावर कॉग्रेस शहर अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी, महिला कॉग्रेस च्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे यांच्या सह अनेक पदधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.