कोरपना:- उन्हाळ्याच्या सुट्टीत अतिरिक्त वर्ग घेण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून मंगळवार, दि. 01 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल लोडे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.
अमोल लोडे हा कोरपना येथील एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. उन्हाळ्यात तो अतिरिक्त वर्ग घेण्याच्या कारणाने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवत होता. यातच त्याने एक अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. मात्र, भीतीपोटी त्या मुलीने ही बाब कुणालाही सांगितली नाही. दरम्यान, मंगळवारी तिच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कोरपना शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पीडिताच्या तक्रारीवरून आरोपी अमोल लोडे याच्यावर कलम ३७६ पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती ठाणेदार दारासिंग राजपूत यांनी दिली.