Warora Assembly Constituency : वरोरा विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार ठरला!

Bhairav Diwase

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दुसरी यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी ४५ नावांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहिम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहे. तर वरोरा विधानसभा मतदारसंघातून प्रविण सुर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी मनसेने ४५ जणांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीतील दोन नावे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आधीच जाहीर केले होते. राजू पाटील आणि अविनाश जाधव यांची नावे राज ठाकरेंनी जाहीर केली होती. त्यानंतर आता मनसेने अमित ठाकरे यांनाही उमेदवारी जाहीर केली.