पोंभूर्णा:- भाऊबीज निमित्ताने गावाकडे जात असताना डोंगरहळदी गावानजीक असलेल्या वळणावर दुचाकीवरून ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सदर घटना रविवार दि. ३ नोव्हेंबरला दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. अक्षय निलकंठ वाढई वय २५ वर्ष, रा.चेक आष्टा ता. पोंभुर्णा असे मृतक तरुणाचे नाव आहे.
वरोरा तालुक्यातील डोंगरगाव येथून चेक आष्टा गावाकडे भाऊबीज सणानिमित्त दुचाकी क्र.( MH12 NG 8956) येत असताना डोंगरहळदी गावानजीक असलेल्या वळणावर दुचाकीवरून ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. व ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोंभूर्णा येथील पोलिस उपनिरीक्षक धनराज सेलोकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोराव नैताम, नरेश निमगडे करीत आहे. भाऊबीजच्या दिवशी सदर घटना घडल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.