Ramnagar police: रामनगर पोलीसांची अवैध धंद्यावर कारवाई

Bhairav Diwase

चंद्रपूर:- दिनांक ३०/५/२४ रोजी गुन्हे शोध पथकतील प्रमुख सपोनी नरोटे व त्यांचे स्टॉफ हे पोस्टे हद्दीत पेट्रोलींगरीत असतांना मुखबीरकडुन खबर मिळाली की एक इसम बाबुपेठकडुन बंगालीकॅम्प कडे ॲक्टीवा मोपेड गाडी एम. एच. ३४ बि.यु. ८९४६ ने अवैधरित्या सुगंधीत तंबाखु घेवून येत आहे. अशा खबरेवरून गुन्हे शोध पथकातील टिम यांनी आशीर्वाद सभागृह बंगाली कॅम्प रोड चंद्रपूर येथे खबरेप्रमाणे सापळा रचुन अवैधरित्या गुटखा तंबाखुची वाहतुक करणारे नामे अजय राजु झाडे वय २१ वर्ष, रा. इंदिरानगर पंचशिल चौक चंद्रपूर ह्यास ताब्यात घेतले. त्याचेकडुन एका प्लास्टीक चुंगळीत १८,७६० रू चा सुंगधीत तंबाखु व वाहतुकीस वापरलेली ॲक्टीवा मोपेड गाडी एम. एच. ३४ बि.यु. ८९४६ कि.अं. ७०,००० रू असा एकुण ८८,७६० रू चा माल जप्त केला.

दिनांक १/११/२४ रोजी गुन्हे शोध पथकतील प्रमुख सपोनी नरोटे व त्यांचे स्टॉफ सह पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना मुखबीरकडुन खबर मिळाली की बंगाली कॅम्प चौक ते सावरकर चौक चंद्रपूर मार्गे हायवा ट्रक एम.एच. ३४ बि. जी. २२१६ मध्ये अवैधरित्या रेतीची वाहतुक होत आहे अशा खबरेवरून गुन्हे शोध पथकातील टिम यांनी रामबाग कॉलनी शितलामाता मंदीर जवळ सापळा रचला असता खबरेप्रमाणे हायवा ट्रक एम.एच. ३४ बि.जी. २२१६ हा रेतीची वाहतुक करीत असता मिळुन आल्याने हायवा चालक नामे प्रविण बाबुराव गुरनुले वय ३७ वर्ष, व त्याचे बाजुला बसलेला इसम नामे नरेश विलास वाढई वय ३६ वर्ष, दोन्ही रा. मुल यांना हायवा ट्रक मध्ये असलेल्या रेतीचा परवाना विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगीतल्याने नमुद दोन्ही आरोपीस ताब्यात घेतले व त्यांचे ताब्यातुन अवैधरित्या वाहतुक करीत असलेले ५ ब्रास रेती कि.अं. ३०,००० रू व एक टाटा कंपनीचा हायवा ट्रक एम.एच. ३४ बि.जी. २२१६ कि.अं. २५,००,००० रू असा एकुण २५,३०,००० रू चा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कार्यवाही चंद्रपूर पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे सपोनी देवाजी नरोटे, हिमांशु उगले, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा /२२७३ शरद कुडे, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / २४५४ प्रशांत शेंदरे, पोहवा / ११६५ आनंद खरात, पोहवा / २४३० लालु यादव, नापोशि २५०१ अमोल गिरडकर पोशि / ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि / ७८७ रविकुमार ढेंगळे, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, मपोहवा/४६२ मनिषा मोरे, मपोशि / २६५३ ब्युल्टी साखरे यांनी कार्यवाही केली.