बल्लारपूर:- 72 बलारपूर विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडी बंड रोखण्यात काहिसा यश आले. मात्र विधानसभेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून डॉ. अभिलाषा गावतुरेंनी कॉंगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ लढवण्यास डॉ. अभिलाषा गावतुरे इच्छुक होत्या. त्यांनी कॉंगेस पक्षाकडे टिकीटही मागितली मात्र महाविकास आघाडीने कॉंगेसचे नेते संतोषसिंह रावत यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली.
बल्लारपूर विधानसभेची उमेदवारी हि शिवसेना (उबाठा) गटाला मिळावी यासाठी शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे व त्यांचे कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. परंतु हि जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष कॉंगेस कडे गेली. त्यानंतर महाविकास आघाडी बिघाडी झाली आणि बंडखोरी करीत शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आपला अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला. कॉंगेस नेत्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी सुध्दा आपला अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला. मात्र 4 नोव्हेंबरपर्यंत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून कोण आपला उमेदवारी नामांकन अर्ज मागे घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. व ती उत्सुकता दि 4 नोव्हेंबरला संपली असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उबाठा) गटाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी आपला उमेदवारी नामांकन अर्ज मागे घेतला. शिवसेना पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार मी उमेदवारीचा अर्ज मागे घेतला आहे. असे प्रसार माध्यमांनी बोलतांना गिऱ्हे यांनी सांगितले. मात्र कॉंगेसच्या नेत्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी आपला उमेदवारी नामांकन अर्ज कायम ठेवला असून ते निवडणूकच्या रिंगणात उतरले आहे. कॉंगेस पक्षाने अधिकृत उमेदवारी संतोषसिंह रावत यांना दिली मात्र डॉ. अभिलाषा गावतुरेंनी बंडखोरी केल्याने कॉंगेसची डोकेदुखी वाढणार आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी प्रसार माध्यमांनी बोलतांना सांगितले की, काँग्रेसमध्ये अनेक अधिकृत उमेदवाराविरुद्ध पक्षातीलच काही इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी ४ तारखेपर्यंत मुदतीच्या आत पक्षाचा आदेश मानून उमेदवारी अर्ज माघारी न घेतल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून पक्षातून हकालपट्टी केली जाईल. आता बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर काय कारवाई होणार हे पाहावं लागेल....