चंद्रपूर:- राज्यातील यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीत मोठी चुरस पहावयास मिळणार होत. मात्र यावेळेसच्या निवडणुकीत महायुतीने एकतर्फी बाजी मारत महाविकास आघाडीचा सुफडासाफ केला. या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महायुती 230 जागांवर तर महाविकास आघाडी 46 जागां जिंकल्या आहे. अपक्ष आणि इतर पक्षांसह इतर उमेदवार 12 जागांवर विजय मिळविला.
जिल्ह्यातील 6 पैकी 5 विधानसभेत भाजपा तर 1 कॉंगेसचा उमेदवार विजयी
वणी-आर्णी-चंद्रपूर लोकसभेत कॉंगेसने बाजी मारीत प्रतिभा धानोरकर खासदार म्हणून विजयी झाले होते. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत कॉंगेसचा सुपडा साफ झाला असून चंद्रपूर जिल्ह्यातील निकाल हा धक्कादायक होता. जिल्ह्यातील 6 पैकी 5 विधानसभेत महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर 1 जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 5 उमेदवारात बल्लारपूरातून सुधीर मुनगंटीवार, राजुरातून देवराव भोंगळे, चंद्रपूरातून किशोर जोरगेवार, वरोरातून करण देवतळे, चिमरातून बंटी भांगडिया निवडून आले तर ब्रम्हपुरीतून महाविकास आघाडीचे विजय वडेट्टीवार निवडून आले आहेत.
चंद्रपूरातील "हे" तिन "वार" विधानसभेवर
चंद्रपूर जिल्ह्यातील तीन वार हे विधानसभेवर गेले आहे. यात बल्लारपूर विधानसभेतून सुधीर मुनगंटीवार, ब्रम्हपुरी विधानसभेतून विजय वडेट्टीवार तर चंद्रपूर विधानसभेतून किशोर जोरगेवार हे विजय झाले आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर मतदारसंघातून 25,985 मतांनी विजय मिळविला, महाविकास आघाडीचे उमेदवार विजय वडेट्टीवार ब्रम्हपुरी मतदारसंघातून 13,971 मतांनी विजयी झाले. तर महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार चंद्रपूर मतदारसंघातून 22,804 मतांनी विजय मिळविला.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ
बल्लारपूर-मूल विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लढत काँग्रेसचे उमदेवार संतोष रावत आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्याशी झाली. मुनगंटीवारांनी 1,05,969, रावत 79,984 तर डॉ. गावतूरेंना 20,935 मते मिळवली. यात बल्लारपूर विधानसभेत रावत व डॉ . गावतूरेंचा पराभव करीत मुनगंटीवार 25,985 मतांनी विजय मिळविला.
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ
ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची थेट लढत महायुतीचे क्रिष्णलाल सहारे यांच्याशी झाली. वडेट्टीवारांनी 1,14,196, सहारेंना 1,00,225 मते मिळवली. यात ब्रम्हपुरी विधानसभेत सहारेंचा पराभूत करीत वडेट्टीवार 13,971 मतांनी विजय मिळविला.
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर जोरगेवार यांची थेट लढत महाविकास आघाडीचे प्रविण पडवेकर यांच्याशी झाली. जोरगेवारांनी 1,06,841, पडवेकरांना 84,037 मते मिळाली. यात चंद्रपूर विधानसभेत पडवेकरांचा पराभूत करीत जोरगेवार 22,804 मतांनी विजय मिळविला.
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभानिहाय निकाल
चंद्रपूर:- किशोर जोरगेवार भाजपा (महायुती)
बल्लारपूर:- सुधीर मुनगंटीवार भाजपा (महायुती)
राजुरा:- देवराव भोंगळे भाजपा (महायुती)
वरोरा:- करण देवतळे भाजपा (महायुती)
चिमूर:- बंटी भांगडिया भाजपा (महायुती)
ब्रम्हपुरी:- विजय वडेट्टीवार कॉंगेस (महाविकास आघाडी)