चंद्रपूर:- सामाजिक,राजकीय योगदानाबद्दल राजुरा तालुक्यातील सिध्देश्वर (देवाळा) येथील युवा नेते राहुल सुर्यवंशी यांची भाजयुमोच्या जिल्हा महामंत्री पदी नियुक्ती करण्यात आली.त्याच्या कार्यकुशलतेमुळे पक्षाला स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळाल्याने ही नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष,हंसराज अहिर यांच्या शिफारशीनुसार भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते यांनी ही नियुक्ती केली आहे. राहुल सुर्यवंशी यांनी भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवून युवक, नागरिकांना जोडण्याचे कार्य केले आहे.गेल्या कित्येक वर्षापासून भाजयुमोच्या (ग्रामीण) जिल्हा उपाध्यक्ष पदावर असताना सामान्य रुग्णालय,चंद्रपूर येथे गोरगरीब रुग्णाच्या मदतीला धावून जात, न्याय देण्याचे कार्य करीत आहे. राहुलची पक्षातील कार्यपद्धती आणि सक्रियता लक्षात घेत भाजयूमोने त्यांना जिल्हा महामंत्री म्हणून नियुक्ती दिली आहे.
सुर्यवंशी यांचे म्हणणे आहे की, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी समाजाच्या प्रत्येक घटकासाठी कार्य करू इच्छितो. माझ्या पदाची जबाबदारी समजून माझ्या कार्याची दिशा ठरवणार आहे. राहुलच्या नेतृत्वात जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणखी सक्षम आणि प्रभावी होईल,असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सुर्यवंशी यांच्या नियुक्ती बद्दल मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या नियुक्तीबद्दल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विजय राऊत, हरीश शर्मा, मा. आमदार संजय धोटे, मा. आमदार सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे,रघुवीर अहिर,महेश देवकते,राजू घरोटे,विनोद शेरखी,प्रशांत घरोटे,पूनम तिवारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.