नागपूर:- नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीकच्या घाटात मोठा अपघात झाला आहे. हिंगणा परिसरातील सरस्वती माध्यमिक विद्यालयाची शाळेची बस पर्यटनाला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
ही घटना आज सकाळी घडली असून, या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 52 विद्यार्थी प्रवास करत होते. या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स बस जंगल घाटामध्ये आली असता बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पलटी झाली. या अपघातात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर काही विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी लोकांनी अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांना मदत केली. तसेच येथून जाणाऱ्या नागरिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिस ताफ्यासह दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी एक विद्यार्थिनीला डॉक्टरने मृत घोषित केले. तर दोन ते तीन जण गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. यातील सर्व विद्यार्थी हे सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती आहे. वर्ध्यात ट्रेंनिगसाठी हे विद्यार्थी गेले होते. वर्ध्यातून नागपूरला ही बस परतत असताना नागपूर- वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या एका घाटामध्ये हा अपघात झाला.
सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक प्रशासनाने अपघाताच्या चौकशीसाठी पथक स्थापन केले आहे.