Throat slit : नववीतील विद्यार्थ्याने वर्गमित्राचा गळा चिरला

Bhairav Diwase

हडपसर:- वार्षिक समारंभावरून झालेल्या वादातून शाळेतील एकाने नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकडय़ाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना मांजरीतील शाळेत घडली. याप्रकरणी 14 वर्षीय मुलाविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यात 15 वर्षीय मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मांजरीतील एका शाळेत तक्रारदाराचा मुलगा नववीत शिकायला आहे. आरोपी मुलगा त्याच्या वर्गात शिकायला असून शाळेत वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात येणार होते. वार्षिक समारंभाच्या आयोजनावरून दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी दुपारी पीडित मुलगा वर्गात बसला होता. त्यावेळी वर्गातील आरोपी मुलाने त्याच्यावर काचेच्या तुकडय़ाने वार केला. जखमी झालेल्या मुलाला शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुलाला ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहाय्यक निरीक्षक दादासाहेब रोकडे तपास करत आहेत.