नागपूर:- विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत.
अनेक पक्षात बंडखोरी करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात रिंगणात असलेल्या आपल्या बंडखोरांवर हकालपट्टीची कारवाई सुरू केली आहे.
यातच भाजपमध्ये बंडखोरी केलेल्या 40 जणांवर पक्षाने कारवाई केली आहे. मात्र काँग्रेसने अजूनपर्यंत बंडखोरांवर कारवाई केलेली नाही. यावर प्रतिक्रिया देत विजय वडेट्टीवार म्हणाले की, गुरुवारी संध्याकाळपर्यंत जेवढे बंडखोर आहेत त्यांची पक्षातून हकालपट्टी होईल. सगळ्यांवर कारवाई होईल. असे वडेट्टीवार म्हणाले.


