चंद्रपूर:- जिवंत काडतुसासह पिस्तूल घेऊन जाणाऱ्या एका आरोपीला आज बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. राकेश चंद्रय्या माटला (वय२८) रा. घुग्घुस असे आरोपीचे नाव आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात जुगार, रेड सुगंधी तंबाखू , तसेच अन्य सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
आज बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चंद्रपूर शहरालगतच्या पडोली कोडोली परिसरात गस्त घालीत होते. दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे एक आरोपी जिवंत काडतुसासह पिस्तूल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पडोली परिसरात मुख्य चौकात नाकाबंदी लावून सापळा रचला. या मध्ये राकेश चंद्रय्या माटला ( वय२८) रा. घुग्घुस याला ताब्यात घेवून त्याचेकडून एक देशी बनावटीची पिस्तूल (बंदुक) व ४ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. सदर आरोपीविरुद्ध पोस्टे पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.