पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा गावातील व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 27 डिसेंबरला दुपारच्या सुमारास घडली. दत्तू विठ्ठू पिंपळकर (वय 55 वर्षे) असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, चेक आष्टा गावातील रहिवासी दत्तू पिंपळकर हे आष्टा येथे गडी म्हणून काम करतो. काल ते दहा वाजताच्या सुमारास आपल्या घरून आष्टा येथे कामासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास आष्टा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर असलेल्या बोडीत मच्छी पकडण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना गावकऱ्यांना कळताचं मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती पोंभुर्णा पोलीसांना मिळताच त्यांनी आपल्या स्टाफसह घटनास्थळ पोहचून मृतदेह ताब्यात घेतले व ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे उत्तरीय तपासाणीकरिता पाठविण्यात आले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह परिवारांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुली असा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोंभूर्णा पोलिस करीत आहेत.