Death by drowning : शिंगाडे काढत असताना बुडून इसमाचा मृत्यू

Bhairav Diwase

गडचिरोली:- गावानजीकच्या बोडीतील पाण्यातून शिंगाडे काढत असताना पाण्यात बुडून एका इसमाचा मृत्यू झाला. देसाईगंज तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथे दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. उमराव बर्वे(५५) असे मृत इसमाचे नाव आहे.

उमराव बर्वे हे शिंगाडे विक्रीचा व्यवसाय करीत होते. दुपारी ते गावानजीकच्या बोडीत शिंगाडे काढण्यासाठी गेले होते. ट्यूबवर बसून शिंगाडे काढत असताना तोल गेल्याने ते पाण्यात पडले. मात्र, पाणी खोल असल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी देसाईगंज पोलिस तपास करीत आहेत.