Death: पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी बुडाले!

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर तालुक्यातील धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाल्याची माहिती समोर येत आहे. यात दोन तरुणी, एक तरुणांचा समावेश आहे. यात एका मुलीला वाचविण्यात यश आले तर दोन जणांचा मृत्यू झालं असल्याची प्राथमिक माहिती आहे.


मृतकाचे नाव संध्या शिंदे रा. जिवती, युगल नागापुरे रा. सोनापूर देशपांडे असे असून समिक्षा शेंडे हिला वाचविण्यात यश आले.

सविस्तर वृत असे की आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूर चे संचालक आदर्श चिवंडे हे आपल्या विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीवर आणले होते. व्यायाम झाल्यानंतर काही मुल-मुली पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली बुडाले. एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही बुडाला. तर विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले. तर एका मुलीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. तर एक मृतदेह पाण्यात डूबून आहे. शोध मोहीम सुरू आहे.

घटननेची माहिती पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी घुग्घुस व गडचांदूर पोलीस दाखल झाले आहेत.