Food poisoning: चंद्रपूर जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

Bhairav Diwase

सावली:- पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळा येथे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या 132 विद्यार्थ्यांनां अन्नातून विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी उघडी आली असून सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचार सुरू आहे.



सविस्तर वृत्त असे की नेहमी नेहमीप्रमाणे शाळेचे विद्यार्थी शाळेत गेले असता काल दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याने 132 विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये दुखणे सुरू झाल्याने, विद्यार्थ्यांनी घराकडे धाव घेतली, विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पोटात दुखत असल्याचे व उलट्या झाल्याचे सांगितले असता पालकांनी त्यांना सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले असता शाळेत कालचे शिळ्या अन्न खाल्ल्याने विद्यार्थ्यासोबतच स्वयंपाक महिला कर्मचारी गोपिका मेश्राम हिला सुद्धा विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले, असून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असून दोशींवर कारवाई करण्या ची मागणी नागरिकांकडून व पालकांकडून करण्यात येत आहे.

पोषण आहारामधुन विद्यार्थ्यांना हगवण, उलटी व ताप आल्याने विद्यार्थ्यांना सावलीचे ग्रामिण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विद्यार्थ्यावर उपचार करण्यात येत असुन निदानानंतर विषबाधा निघाल्यास दोषीवर कारवाई करण्यात येईल.
मोरेश्वर बोंडे, गटशिक्षणाधिकारी पं.स. सावली

शालेय पोषण आहारामध्ये विषबाधा झालेला प्रकार गंभीर असून योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर