नागपूर:- सध्या निवडणुका आटोपल्या आहेत. त्यामुळे अनेक रखडलेल्या भरतीची मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलात २ लाख २१ हजार २५९ मंजूर पदांपैकी ३३ हजारांवर पदे रिक्त आहेत. त्यात महिला पोलिसांच्या १६.६ टक्के पदांचा समावेश, अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १ लाख लोकसंख्येमागे २२२ पोलीस कर्मचारी असायला हवेत. या अनुषंगाने पोलीस भरती च्या हालचाली सूरू झाल्याचे समजते आहे.
मात्र, भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी १५२ पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही ७० ने कमी आहेत. देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत. येथे जवळपास ४१ टक्के पोलीस कर्मचारी कमी आहेत. त्यामुळेच या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते. तेलगंणात २८ टक्के, तर महाराष्ट्रात जवळपास १६.३ टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत.
नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्येपेक्षा काही जागा रिक्त आहेत. परंतु, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे. रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहे. - निसार तांबोळी, पोलीस सहआयुक्त, नागपूर पोलिस विभाग