चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात काल रात्री दहा वाजताच्या सुमारास एका 28 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. रितिक अनिल शेंडे असे मृतक व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेची माहिती संदीप आगडे यांना होताच ते आपल्या मित्रासह येऊन रितिक शेंडे याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले.
घटनेची माहिती मुल शहरात वाऱ्या सारखी पसरली आणि नागरिकांनी एकच गर्दी केली. तीन संशयित आरोपी असल्याचे पोलिसांनी माहिती दिली असून त्यांचे मोबाईल बंद येत असून त्यांच्या शोधात तीन टीम तयार केले असून आरोपीचा शोध सुरु आहे. शांतीप्रिय असलेल्या मुल शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केल्या जात आहे. झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुल शहरात बंद ची हाक पुकारण्यात आली आहे.