Murder News : आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाला बॉक्सर मुलगा देतो मृत्यूचं गिफ्ट!

Bhairav Diwase

नवी दिल्ली:- तिहेरी हत्याकांडने दक्षिण दिल्ली हादरली होती. आई-वडील आणि मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मुलगा मॉर्निंग वॉक करुन घरी आल्यानंतर त्याने हा थरार पाहिला आणि पायाखालची जमीन सरकरली, पण धक्कादायक बाब तर हीच होती की मुलानेच हत्या केल्याचं तपासात समोर आलं. त्याने आपल्याला काही माहिती नसल्याचा बनाव रचला आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चौकशीत फसला.

वंशाचा दिवाच निघाला खुनी

दक्षिण दिल्लीतील देवळी येथे बुधवारी सकाळी झालेल्या तिहेरी हत्याकांडाने सर्वांनाच धक्का बसला. एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याने परिसरात पहिली खळबळ उडाली, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर मुलाच खुनी असल्याचं समोर आलं. बुधवारी दक्षिण दिल्लीतील नेब सराय भागात पती-पत्नी आणि मुलीच्या हत्येच्या काही तासांनंतर पोलिसांनी दाम्पत्याच्या मुलाला अटक केली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीचं त्याच्या आई-वडिलांशी पटत नव्हतं. बुधवारी सकाळी राजेश कुमार (51), त्यांची पत्नी कोमल (46) आणि त्यांची मुलगी कविता यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घरात आढळून आला. त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. राजेश यांचा मृतदेह पहिल्या मजल्यावर आढळून आला, तर त्याची 46 वर्षीय पत्नी कोमल आणि मुलगी कविता यांचे मृतदेह तळमजल्यावर वेगळ्या बेडवर आढळून आले.

हत्येमागे नेमकं कारण काय?

आई वडिलांचं कल मुलापेक्षा जास्त मुलीकडे होता. ती जास्त जबाबदार असल्याचं त्यांना वाटत होती. इतकंच नाही तर संपूर्ण संपत्ती मुलीच्या नावावर करण्याचा त्यांचा मानस होता. आई वडिलांचं मुलाशी पटत नव्हतं, वारंवार खटके उडत होते. त्याच रागातून मुलाने टोकाचं पाऊल उचलल्याचं चौकशीत समोर आलं आहे. पोलिसांचा खाक्या दाखवल्यानंतर पोपटासारखं आरोपीनं सगळं कबूल केलं.

कसा गुन्हा कबूल केला

पोलिसांनी उलट सुटल प्रश्न विचारल्यानंतर त्याची धांदल उडली. प्रश्नांची उत्तर एकमेकांना मॅच होत नाहीत हे पोलिसांच्या लक्षात आलं. काही प्रश्नांची उत्तरं तर विरोधाभास जाणावण्यासारखी होती. काही वेळानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. एका आठवड्यापूर्वी त्याने कुटुंबाला संपवण्याचा कट रचला होता. हत्येनंतर तो यात अडकू नये म्हणून मॉर्निंग वॉकला गेल्याचा बनाव रचला. त्याने पोलिसांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न केला.

आरोपी आणि वडिलांचं नेहमी अभ्यासावरुन भांडण व्हायचं, तर बहीण कशी हुशार आहे याचे दाखले दिले जायचे त्यामुळे डोक्यात राग बसला होता. आरोपी दिल्ली विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातून राज्यशास्त्रात बीए करत होता. तो प्रशिक्षित बॉक्सर असून त्याने बॉक्सिंगमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने मेडल्सही मिळवली आहेत मात्र कुटुंबियांना त्याचं कौतुक वाटायचं नाही, त्याला सारखं टोकत असायचे. त्यामुळे आई वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवशीच त्याने सगळ्यांचा कायमचा काटा काढण्याचं मनात पक्क केलं आणि त्याने प्लॅन करून आई वडील आणि बहिणीची हत्या केली.