Naxalites Death:चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा

Bhairav Diwase

छत्तीसगड:- छत्तीसगडच्या नारायणपुर जिल्ह्यातील दक्षिण अबूझमाड परिसरात आज सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षादलाला मोठे यश मिळाले आहे. यामध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

या चकमकीत सुरक्षादलाने आतापर्यंत सात नक्षलवाद्यांना कंठस्थान पोहोचवले आहे. पोलिसांना सात नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. या चकमकीत केंद्रीय समिती स्तरावरील एक नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. सकाळी तीन वाजल्यापासून थांबून थांबून गोळीबार होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यातील जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) यांच्यासह विशेष टास्क फोर्स (एसटीएफ) आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त दलाने दक्षिण अबुझमद भागाकडे रवाना केले. नक्षल शोधमोहीम झाली होती.