चंद्रपूर:- लोकनेता काय असतो आणि कसा असावा, याचा प्रत्यय नागपूरच्या राज भवनमधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर आला. भाजपचे बलाढ्य नेते, राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरात एक नाराजीची लाट पसरली. ही लाट एकट्या भाजप पक्षातच नव्हती, तर विरोधी पक्षातील नेतेही मुनगंटीवारांना डावलण्यात आल्याने अजूनही 'शॉक'मध्ये आहेत.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुती ला घवघवीत यश मिळाले. राज्यात महायुती सरकार चा हिवाळी अधिवेशना नंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला परंतु यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री वने, सांस्कृतिक, मत्स्य व्यवसाय यांना मंत्रिमंडळतात स्थान दिल्या गेले नाही त्यामुळे व्यथित होऊन जिल्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे सत्र सुरु केले अश्यातच भाजपा महिला प्रदेश महामंत्री कु अल्का आत्राम यांनी सुद्धा आपल्या प्रदेश महामंत्री पदाचा राजीनामा महिला प्रदेश अध्यक्षा चित्राताई वाघ यांच्याकडे पाठविला आहे.
त्यांचे म्हणणे असे आहे की, सुधीरभाऊ सारख्या उत्तम संघटन कौशल्य आणि आणि मंत्री मंडळातील दीर्घ अनुभव असलेल्या अतिशय कर्तबगार, निर्णयशील, कृतिशील, विनयशील व्यक्तिमत्वाला डावलून एक प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय केल्यासारखे वाटते ज्या नेत्यांकडे पाहून आपण आजवर काम करीत आलो त्या नेत्यांचा सन्मान होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. जरी पक्षात काम करताना व्यक्तीविशेष काम करत नाही तरी भाऊंना एक संधी द्यायला पाहिजे होत कारण त्यांच्यावर कुठलेही भष्टाचार आरोप नाही, कोणतेही गुन्हे नाही, कोणत्याची प्रकारची कोणतीही निष्क्रिय नाही तरी अशी कोणती गोष्ट आहे की त्यांना मंत्रिपद दिले नाही. मंत्रिपद भाऊ साठी महत्वाचे नाही तर लोकांच्या कल्याणकारी योजना विकास यासाठी एकदा पाहिजे ही जनतेला आवश्यक आहे. म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.