Sardar patel mahavidyalaya Chandrapur: गोंडवाना विद्यापीठस्तरीय फूटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाने पटकाविले अजिंक्यपद

Bhairav Diwase
चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालय अजिंक्य पद पटकाविले आहे.

गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धा तळोधी येथील भगवान श्री. चक्रधर स्वामी शारिरीक शिक्षण महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परीक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघानी सहभाग घेतला. या फुटबॉल स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविले. विजेते पद खेचून आणण्याकरिता मुलांच्या संघात रोहित मंडल, सुमन सरकार, पंकज बावरे, जीत मोंडल, लोरिक यादव, अनुज येनुरकर, आदित्य राजभर, रवी राजभर, यश धकाते, अभिजित मंडल, तेजस डंभारे, संस्कार बडकेलवर, अरिहंत यादव, सुगत मून, अमित मडावी, साहील गायकवाड यांनी आपल्या सुरेख खेळ, रणनीती व कौशल्याचे प्रदर्शन केले.

दरम्यान संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावर, कला विभाग प्रमुख डॉ. सुनीता बन्सोड, विज्ञान विभाग प्रमुख डॉ. विजय वाढई, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. राहुल सावलीकर, संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. बी. किशोर, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुष्पांजली कांबळे, प्रा. विकी पेटकर, हनुमंतू डंभारे, निलेश बन्नेवार, कु. नागु कोडापे प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.