बल्लारपूर:- बल्लारपूर - चंद्रपूर महामार्गावर एसएनडीटी निर्माणाधीन विद्यापीठा जवळील वळणावर दि.२९ डिसेंबरला दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने गंभीर अपघात घडला होता. त्यामधील बंडू डांगे (४६) युवकाचे १ जानेवारी बुधवारला उपचारा दरम्यान चंद्रपूर येथे खाजगी रुग्णालयात निधन झाले व दुसरा यामध्ये दुचाकीस्वार मिलिंद गाडगे याला त्याची प्रकृती अतिगंभीर झाल्याने त्याच दिवशी नागपूरला हलविले. बंडूचे निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे आणि आणखी किती लोकांचा सर्व्हिस रोड नसल्याने त्या वळण रस्त्यावर बळी जाणार असा संतप्त सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहे.
विसापूर गावामधून बल्लारपूर जाण्यासाठी निर्माणाधीन एसएनडीटी विद्यापीठा मधून बल्लारपूर- चंद्रपूर महामार्गाला जोडणारा आहे. तो मार्ग गावकऱ्यांना सोयीचा परंतु बॉटनिकल गार्डन व एसएनडीटी विद्यापीठाच्या बांधकामामुळे तेथे खूप मोठ्या प्रमाणात रहदार वाढली आहे. त्यामुळे यू टर्न करणारा मुख्य महामार्गावरील (बॉटनिकल गार्डन जवळील) रोड बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक वाहन चालक रॉंग साईड आपापली वाहने टाकतात. यामुळे त्या मार्गाने सरळ जाणाऱ्या वाहनाला अडथळा निर्माण होतो व यामध्येच चुकामुका होऊन अनेक अपघात घडले आहे व त्यामध्ये अनेकांनी आपले जीव सुद्धा गमावलेले आहे. यासाठी संबंधित विभागाने आणि शासनाने सर्व्हिस रोड बनवावे अशी बरेच वर्षापासून विसापूर येथील नागरिकांची मागणी आहे. परंतु शासन व प्रशासन याकडे डोळेझाक करून अनेकांचा बळी घेत आहे. आता तरी यावर ठोस उपाययोजना करून संबंधित विभागाला सर्व्हिस रोड बनविण्यासाठी भाग पाडावे अशी मागणी नागरीक करत आहे.