पोंभूर्णा:- देवाडा खुर्द बेघर वस्तीजवळच्या आंबे तलाव लगत आस्वलीने तीन दिवसांपासून बस्तान बसवले असून तीचा वावर गावातही सुरू झाल्याने येथील नागरिकांनी धास्ती घेतली आहे.सकाळच्या सुमारास तिचा वावर असल्याने शेतकरी व त्याच वाटेने ये जा करणारे विद्यार्थ्यांना दहशत निर्माण झाली आहे.अस्वलीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.तीन दिवसापासून अस्वलीचा वावर असल्याने वनविभागाने कर्मचारी व टीआरटीची टिम तैनात केली असून अस्वलीला जंगलात पळवून लावण्याचे काम केले जात आहे.
देवाडा खुर्द येथील बेघर वस्तीजवळील आंबे तलाव नजीक अस्वल मागील चार दिवसापासून पहाटेच्या सुमारास दिसत असल्याने गावात दहशतीचे वातावरण आहे.रात्री सुद्धा अस्वलीचा वावर गावानजीक असल्याची माहिती आहे.आंबे तलाव व गावाजवळ बोरीचे झाडं असल्याने अस्वल बोरी खाण्यासाठी येत असल्याने तीचा वावर गावाजवळ वाढलेला आहे.आंबे तलाव परिसरात शेतकरी शेतकामासाठी जात असतात.अस्वलीचा हल्ला झाला तर इजा होऊ शकते हि भिती गावकऱ्यांना सतावत आहे.वनविभागाने अस्वलीला जंगलात पळवून लावण्यासाठी वनविभागाने कर्मचारी व टीआरटीची टिम तैनात केली असून अस्वलीला जंगलात पळवून लावण्याचे काम केले जात आहे.गावकऱ्यांनीही सतर्कता बाळगली आहे.चार दिवसात अस्वलीने कुणालाही इजा केली नसल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.मात्र गावानजीक वावर असलेल्या अस्वलीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
देवाडा खुर्द गावानजीक जंगल असल्याने वन्य प्राण्यांचा वावर गावाजवळ नेहमीच पाहायला मिळते.गावातील लोकांना वन्य प्राण्यांपासून नेहमीच धोका असतो.