चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित डिजिटल साक्षरतेकरिता भारतीय युवाशक्ती या विषयावर महाविद्यालयीन विशेष शिबिराचे आयोजन दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 पर्यंत ग्रामपंचायत विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आज विसापूर गावातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.
भारतीय संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावेत, स्वातंत्र्याच्या मुल्यांसह राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी. यासाठी संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रॅलीत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.