NSS Camp: मातोश्री वृद्धाश्रमात भेट अन् स्वयंसेवकांना अश्रू अनावर

Bhairav Diwase

चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित डिजिटल साक्षरतेकरिता भारतीय युवाशक्ती या विषयावर महाविद्यालयीन विशेष शिबिराचे आयोजन दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 पर्यंत ग्रामपंचायत विसापूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

आज दिनांक 16 जानेवारीला मातोश्री वृद्धाश्रम येथे भेट देण्यात आली. यावेळी वृध्दांना फळे वाटप करण्यात आले. तसेच स्वयंसेवकांनी वृध्दांच मनोरंजन करीत हितगुज साधला. यावेळी वृध्दांच्या आणि स्वयंसेवकांना अश्रू अनावर झाले.


यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.