Nss camp closing ceremony: शिबिरातून निरोप घेताना स्वयंसेवकांच्या डोळ्यात अश्रू

Bhairav Diwase
चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा आयोजित डिजिटल साक्षरतेकरिता भारतीय युवाशक्ती या विषयावर महाविद्यालयीन विशेष शिबिराचे आयोजन दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी 2025 पर्यंत ग्रामपंचायत विसापूर येथे आयोजित करण्यात आले होता. दि. 17 जानेवारीला या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोपीय समारंभ आयोजित केला होता.

प्राचार्य संजय सिंह म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे.
अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रकाश शेंडे म्हणाले की, अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्ष डॉ. प्रकाश शेंडे इतिहास विभाग प्रमुख, प्रमुख पाहुणे डॉ, संजय सिंह प्राचार्य शरदचंद्र पवार महाविद्यालय गडचांदूर, डॉ. दिलीप जयस्वाल सचिव, शिलादेवी मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी, चंद्रपूर, प्रा. शालीनी आंबटकर प्राचार्य राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर, अनकेश्वर मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर, शारदा डाहूले सदस्य ग्रामपंचायत विसापूर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना डॉ. उषा खंडाळे म्हणाले की, या शिबिरात रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम, वाचन संस्कृती, अंधश्रद्धा निर्मूलन, आरोग्य तपासणी शिबिर या विषयावर वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गावात संविधान सन्मान रॅली व स्वच्छतेवर जनजागृती करण्यात आली. स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

उठे समाज के लिए उठे उठे
जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे
स्वयं सजे वसुंधरा संवार दे
स्वयं सजे वसुंधरा संवार दे..

याच गाण्यांनी सकाळची झोप उघडायची..


या शिबिराचे संचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी निखिल देशमुख, प्रास्ताविक व अहवाल वाचन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. उषा खंडाळे तर आभार रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके यांनी केले. तर रोशन चौधरी या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.


शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खनके, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. राजकुमार बिरादार, शशीकला पारधी, हनूमंतू डंबारे, अमित बडघरे, निलेश बन्नेवार, रुचिता टोकलवार, नागू कोडापे, संदेशा निकोडे, इजाज शेख, सुरज बोरघरे, भैरव दिवसे, मुबारक शेख , धनपाल चनकापुरे, सिध्दांत निमसरकार, दर्शन मेश्राम, साहिल गायकवाड, गौरव झाडे, शालिनी निरमलकर यांनी परिश्रम घेतले.