कोरपना:- लोणी येथील काँग्रेस व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. राजुरा विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे यांचा नागरी सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये यामध्ये वनसडी येथील विवेक काकडे,लोणी येथील देविदास आवारी,दत्तू आवारी, अशोक पोटवडे,बंडू वरारकर,रवींद्र आवारी, सुरेश वनकर,गजानन आवारी,वसंता अत्राम यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळेस लोणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, अर्चनाताई भोंगळे,भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री प्रमोद कोडापे, कोरपणा शहराध्यक्ष अमोल आसेकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,लोणी सरपंच रिपीका येलपूलवार,उपसरपंच अविनाश वाभीटकर,माजी उपसरपंच संजय पिंपळशेंडे,तालुका उपाध्यक्ष प्रमोद पायघन,माथा उपसरपंच शशिकांत आडकीने,माजी सरपंच वृंदा आत्राम, ग्रामपंचायत सदस्य सोनू भोंगळे,दिनेश ढेंगळे,भारत काकडे विकास मुसळे गंगाराम मोहुर्ले,उपस्थित होते. नागरिकांची व महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.