Journalist's : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ कोरपना तालुका अध्यक्ष पदी मुमताज अली यांची निवड

Bhairav Diwase

कोरपना:- पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला गडचांदुर येथे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन व जिल्हा टीमच्या प्रमुख उपस्थितीत कोरपना तालुका महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची वार्षिक आढावा बैठक पार पडली.यामध्ये सर्वानुमते तिसऱ्यांदा 'सैय्यद मुम्ताज़ अली' यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

यानंतर लगेच तालुकाध्यक्ष अली यांनी नवीन तालुका कार्यकारिणी घोषित केली.यामध्ये गणेश लोंढे कार्याध्यक्ष,उपाध्यक्ष अनिल गेडाम,सचिव सतिश बिडकर,सहसचिव अमोल बेरड,संघटक गौतम धोटे,तर मयुर एकरे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.जिल्हा टीमने सर्व नवनियुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.