चार विधिसंघर्षगस्त बालक पोलीसांच्या ताब्यात
चंद्रपूर:- दिनांक ०३/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०७:०० वा. च्या सुमारास पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे माहिती मिळाली की, अंचलेश्वर गेट जवळील रस्त्यावर काही मुलांचे आपसामध्ये भांडण होवुन ते सर्व महाकाली मंदीर रोडकडे गेल्याची खबर मिळाली, यावरून तात्काळ पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन बंद्रपुर शहर यांनी वरिष्ठांना माहिती देवुन त्यांचे सुचनेनुसार विविध शोध पथके प्रकरणाची खात्री करण्याकरीता पाठविले असता, काही वेळातच यातील मृतक तन्मय जावेद खान याचा भाउ राहील जावेद खान पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथे येवुन सांगीतले की, त्याचा भावाच्या गाडीचा किरकोळ अपघात झाल्याने काही मुले त्यास नुकसान भरपाई म्हणुन पैशाची मागणी करीत असल्याचे त्याचे लहान भाउ मृतक तन्मय याने आपले मित्राला फोन करून सांगीतले आहे तरी माझ्या भावाचा शोध व्हावा असे सांगीतल्याने त्याचे कडुन त्याचा भावाचा मोबाईल क्रमांकाचा लोकेशन घेतले असता, सदर मोबाईलचे लोकेशन महाकाली मंदीराजवळील गौतम नगर येथील असल्याने शोध घेत लोकेशनच्या ठिकाणी पोहचले असता, तिथे मृतकाचे दुचाकी वाहन दिसुन आली त्याचे काही अतंरावर मृत अवस्थेतील प्रेत व मोबाईल फोन मिळून आला. लगेच परिसरात विचारपुस करून माहिती घेतली असता, त्याचेशी भांडण करून मारहाण करणारे यातील चार विधिसंघर्ष बालक असुन त्यांचा शोध घेवुन काही वेळातच त्यांना ताब्यात घेण्यात आले.
सदर विधिसंघर्ष बालकांकडे विचारपुस केली असता, त्यांनी कबुली दिली आहे की, त्यांचे व मृतकाचे दुचाकी वाहनाचे आपसात किरकोळ अपघात झाल्याने त्यांनी मृतकास नुकसान भरपाई दयावे म्हणून महाकाली मंदीर गौतम नगर कडे त्यांचे सोबत घेवुन जावुन घटनास्थळी नुकसान भरपाईच्या रकमेवरून वादविवाद करुन त्याला लाताबुक्क्यानी व दगडाने वेदम मारहाण करून त्याचा चेहरा दगडाने ठेचुन त्यास जिवानिशी ठार केले.
यावरुन पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.