निषेध कृती समिती तालुका राजुरा यांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा.

Bhairav Diwase
निषेध कृती समिती तालुका राजुरा यांचा तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा.   
    
राजुरा:- दि, ३० डिसेंबर रोजी निषेध कृती समिती राजुरा यांनी  डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, संविधान चौक राजुरा इथुन भव्य मोर्चा काढण्यात आला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल दि, १८ डिसेंबर रोजी राज्य सभेत संविधानावर चर्चा करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये अपमान केला आहे.

त्यामुळे सविधान प्रेमी तसेच बहुजन समाज बांधवांनच्या भावना दुखावल्या गेल्या आहे, तसेच परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतडयाजवळ बंद काचेत असलेल्या सविधानाच्या प्रती कृतीची मोडतोड करण्यात आली, त्यामुळे परभणी येथे निषेध मोर्चा काढण्यात आला, त्या दरम्यान तेथील पोलीस प्रशासन यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांना बेदम मारहाण कली, त्या मुळे  पोलीस कोठडीत  सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला, या दोनही घटनेचा निषेध म्हणून, निषेध कृती समिती तालुका राजुरा कडून करण्यात आला, या मोर्चाचे नेतृत्व निषेध कृती समितीचे सदस्य श्री, विजय जुलमे यांनी केले, श्री विजय जुलमे यांच्या नेतृत्वात सविधान चौक ते तहसील कार्यालय राजुरा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला, या मोर्चासाठी कृती समितीचे सर्व सदस्य, सुरेश मेश्राम, ऑडो, भिमराव दुर्गे, रमेश नळे, विलास पाटील सर,योगेश करमनकर, किशोर रायपुरे, रुषी रायपुरे, सचिदानंद रामटेके, मुरलीधर ताकसांडे, प्रा, भगवान धोंगडे, मिलिंद झाडे ,प्रकाश शेंडे साहेब, ऑडो,सत्यपाल कातकर, नागोराव पडवेकर ,निवारण कांबळे सर, धर्मू नगराळे  गौतम चौरे,  निरंजन फुसाटे,सिध्दार्थ रनविर  ,महेन्द्र साखरकर,विवेक बक्षी सर,इश्वर देवगडे, अमोल राऊत  प्रभुदास वनकर  विठ्ठल धोटे,प्रियाताई खाडे, सुप्रभा कुंभारे पौर्णिमा ब्राम्हणे,वंदना देवगडे , पुष्पवर्शा जुलमे, रेखा रामटेके, किरण ताई खैरे,शुभांगी धोटे,उपरे ताई, तसेच तालुक्यातील इतर सर्व महिला पुरुष यांचे या मोर्चा यशस्वी करण्यासाठी खूप मोठे सहकार्य केले आहे,