Suicide News: थर्टी फस्टची पार्टी करून त्याने केली आत्महत्या

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- तालुक्यातील सोनापूर येथील एका तरुणाने मित्रांसोबत थर्टी फस्टची पार्टी करून घरी आला. घरची मंडळी झोपेतच असताना घरच्यांना न सांगता दुचाकी घेऊन एक वाजताच्या दरम्यान तो घराबाहेर निघून गेला आणि त्यांनी गावाजवळच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सदर घटना दि.१ जानेवारीला सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विकास परशुराम वडस्कर (वय २७ ) वर्ष रा. सोनापूर असे मृतक युवकाचे नाव आहे. आत्महत्याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे की, थर्टी फस्ट च्या निमित्ताने मित्रांनी गावात पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत विकासने भाग घेतला होता. पार्टी आटोपून तो घरी आला घरच्या कुणालाही न सांगता तो खोट्यात ठेवलेली दुचाकी क्र. (एम एच ३४ बिके ६७७१) ने घराबाहेर निघून गेला व त्याने गावाजवळील शरद ठेंगणे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

सकाळी वडीलांनी मुलगा घरी नसल्याचे दिसताच त्यांनी मित्रांकडे फोन केले पण कुणाकडूनही त्याचा पत्ता मिळाला नाही. इकडे तिकडे शोध घेत असताना शरद ठेंगणे यांच्या शेतातील विहिरीजवळ दुचाकी उभी असल्याचे दिसून आले. व विहीरीत चप्पल तरंगताना दिसून आली. त्यामुळे विहिरीत गळ टाकून पाहिले असता विकासचा मृतदेह आढळून आला.

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. शवविच्छेदन करून घरच्यांना मृतदेह सोपविण्यात आले. नेमके आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. विकासच्या पश्चात आई, वडील, आजोबा, बहिण व भाऊ असा आप्त परिवार आहे. सदर घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.