माजरी येथे रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांची भेट,

Bhairav Diwase

भद्रावती:- माजरी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील भद्रावती - वणी मुख्यरस्त्यवरील रेल्वे परिसरात रेल्वे जी.एम.चे आढावा दौरा दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोज शुक्रवार ला पूर्वनियोजित होता बल्लारशहा ते भद्रावती त्यामधे त्यांच्या भेटीदरम्यान माजरी रेल्वे स्थानकातील कोरेना काळात बंद झालेल्या अनेक ट्रेनचे थांबे पुर्ववत सुरू करण्यासाठी , तसेच माजरी गेट नंबर 32 A ,32 B प्रवाशी नागरिकांसाठी गाड्या तासनतास बंद असते त्यामुळे माजरी येथील स्थानिक नागरिकांना , विद्यार्थ्यांना, तसेच रुग्णांना तालुका, किंवा जिल्हा, स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसतो ,या सर्व गंभीर बाबीचा आढावा डॉ.अंकुश आगलावे,तसेच गावातील नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदन देवून अश्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मागणी केली ही मागणी डॉ.अंकुशभाऊ आगलावे , एम.पी.राव, सुधीर उपाध्ये, विजय पोतदार, सरपंच छाया जंगम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमद्ये माजरी येथील सर्व पत्रकार च्या वतीने सविस्तर बोलणी करवून रल्वे जी.एम.धर्मवीर मीना यांना निवेदन देवून करण्यात आली.