चंद्रपूर:- येथील सरदार पटेल महाविद्यालयात गणित विभागाकडून पीएम उषा स्कीम अंतर्गत जी एस सी रूसा याद्वारे तज्ञांची विचार ज्ञान आणि माहिती विद्यार्थ्यांना मिळावी याकरिता वैदिक मॅथेमॅटिक्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.
सरदार पटेल महाविद्यालयाच्या अब्दुल शफी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर हे होते तर अभ्यासक व जानकर डॉ. एस. एम. देशपांडे एक्स प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स महाविद्यालया आमगाव डॉ.आर.के.अग्रवाल प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स हिस्लाप कॉलेज नागपूर व डॉ. व्ही. कुमार असिस्टंट प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा हे होते यासोबतच महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ. आर.बी. सिसोदिया असोसिएट प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स व गणित विभागातील इतर सहकारी प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.
वैदिक मॅथेमॅटिक्स बाबत कार्यशाळेचे मार्गदर्शन करीत असताना डॉ.एस. एम. देशपांडे सरांनी आजच्या युगात वैदिक मॅथेमॅटिक्स किती महत्त्वपूर्ण आहे व त्याचा उपयोग शिक्षणात दैनंदिन व्यवहारात केल्यास किती वेळेची बचत होते हे समजावून सांगितले त्यानंतर त्यांनी पावर पॉइंट च्या माध्यमातून या विषयावर सखोल मार्गदर्शन केले यानंतर डॉ. आर. के. अग्रवाल सर व डॉ.व्ही.कुमार सर यांनी देखील वैदिक मॅथेमॅटिक्स विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना उदाहरणाद्वारे समजावून सांगितले
कार्यक्रमाची प्रस्ताविक गणित विभाग प्रमुख डॉ. आर. बी. सिसोदया सर यांनी केले त्यांनी आजच्या युगात वैदिक मॅथेमॅटिक्स चे महत्व काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुविधा चिंतावर यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. वैष्णवी कामडे यांनी केले व कार्यशाळेला गणित विभागातील प्रा. साक्षी साखरकर प्रा. काजल फुलझले तसेच गणित विभागातील व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अरविंद सावकर पोरडीवर कार्यकारी अध्यक्ष श्री किशोर भाऊ जोरगेवार उपाध्यक्ष श्री सुदर्शन निमकर सचिव श्री प्रशांत पोटदुखे सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली माननीय डॉक्टर कीर्तीवर्धन दीक्षित कोषाध्यक्ष श्री संदीप वामनराव गड्डमवार व सन्माननीय सदस्य श्री राकेश पटेल ,श्री एन रमजान, श्री सगुनाताई तलांडी व कार्यकारणी सदस्य श्री सुरेश पोटदुखे सर्वसाधारण सदस्य श्री चंद्रशेखर वाडेगावकर ,श्री जिग्नेश सुधीर पटेल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर उपप्राचार्य डॉ.एस. व्ही.माध्यमशेट्टीवार, गणित विभाग प्रमुख डॉ.आर.बी. सिसोदिया प्रा.सुविधा चिंतावर व गणित विभागातील इतर प्राध्यापक वृंद यांनी यशाबद्दल अभिनंदन केले