चंद्रपूर:- तक्रारदार हे मौजा लोंढोली ता. सावली जि. चंद्रपूर येथील रहीवासी असून त्यांचे वडीलांचे नावे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मंजुर झाले आहे. सदर घरकुल मंजुर झाल्यानंतर त्यासंबंधाने तकारदार हे संपुर्ण काम पाहत होते.
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजुर झालेल्या एकूण १,२०,०००/-रू. पैकी पहिला हप्ता १५,०००/-रू. दिनांक २२/०२/२०२५ रोजी तक्रारदार यांना मिळालेला आहे. परंतु मौजा लोंढोली येथील ग्रामसेवक चंद्रशरेखर केशव रामटेक यांनी तक्रारदार यांनी तक्रारादार यांना दुसरा हप्ता ७०,०००/-रू. मंजुर करून देण्याचे कामाकरीता तक्रारदार यांना २०,०००/-रू. लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची चंद्रशेखर रामटेके ग्रामसेवक लोंढोली यांना २०,०००/-रु. लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने श्री. रामटेके यांचे विरुध्द ला.प्र.वि. कार्यालय चंद्रपूर येथे तक्रार दिली.
प्राप्त तक्रारीवरून दिनांक २५/०२/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान गै.अ. चंद्रशेखर केशव रामटेके, ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांना २०,०००/-रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती १०,०००/-रू. २५/०२/२०२५ रोजी व १०,०००/-रू. नंतर स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दिनांक २५/०२/२०२५ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान गै.अ. चंद्रशेखर रामटेके यांनी तक्रारदाराकडून १०,०००/-रु. लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. त्यावरून दिनांक २५/०२/२०२५ रोजी पो.स्टे. सावली, जि. चंद्रपूर येथे आरोपी ग्रामसेवक यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, म.पो.अं. पुष्पा काचोळे, चा.पो.अं. संदिप कौरासे यांनी यशस्वी पार पाडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.