Chandrapur Police: खांदेपालट: चंद्रपूर पोलीस दलात मोठे बदल

Bhairav Diwase

चंद्रपूर:- मागील बऱ्याच दिवसापासून पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे वारे सुरू असतानाच शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले.


एलसीबीचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांची आर्थिक गुन्हे शाखा तर त्यांच्या जागी भद्रावतीचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांची वर्णी लागली आहे. दुर्गापूर येथील पोलिस निरीक्षक लता वाडिवे यांची भद्रावती येथे तर प्रभारी पोलिस उपाधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांची दुर्गापुर पोलिस स्टेशनला बदली करण्यात आली आहे.