Delhi Assembly Elections: भाजपाच्या लाटेत दिग्गज भुईसपाट! केजरीवाल, सिसोदियांचा पराभव
शनिवार, फेब्रुवारी ०८, २०२५
दिल्ली:- दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टीची सत्ता संपुष्टात आली आहे. अरविंद केजरीवाल यांना हॅटट्रीक काही करता आली नाही.
भाजपाने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातातून अक्षरशः हिसकावून घेतली आहे. दिल्लीकरांच्या मनात नेमकं काय होतं याचा अंदाज अखेर समोर आला. आम आदमी पक्षाचे दिग्गज नेतेही या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, जंगपूरा मतदारसंघातून दिग्गज नेते मनिष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे.
Tags