आप आणि काँग्रेस पिछाडीवर; अरविंद केजरीवालही मागे
दिल्ली:- दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांच्या निकालासाठी आज मतमोजणी होत आहे. दरम्यान सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात भाजपने मुसंडी मारली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात. पोस्टल मतांच्या मोजणीत भाजपची मोठी मुसंडी. निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे. त्याच वेळी, आम आदमी पक्षाला 25 आणि काँग्रेसला 0 जागेवर आघाडी मिळताना दिसत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांवर कोण बाजी मारणार, याबद्दल राजकीय वर्तुळाला उत्कंठा आहे. यापूर्वी 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये 'आप'ने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली म्हणजे ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. परंतु, यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. भाजपकडून सातत्याने अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपांमुळे दिल्लीकरांचा अरविंद केजरीवाल आणि ‘आप’वरील विश्वास डळमळीत होतो का, हे आज जाहीर होणाऱ्या निकालांमधून स्पष्ट होईल.