Chandrapur Crime News: चंद्रपूर शहरात पोलीस शिपाईची हत्या; हि आहेत आरोपींची नावे?

Bhairav Diwase


चंद्रपूर:- दिनांक ७ मार्च, २०२५ रोजी रात्रौ दरम्यान पो.स्टे. चंद्रपूर शहर हद्दीतील पिंक पॅराडाईज बार मध्ये आरोपी इसम नामे नितेश जाधव आणि अक्षय उर्फ आकाश शिर्के याचे पिंक पॅराडाईज बार येथील बिल देण्यावरुन मॅनेजर सोबत वाद करीत असतांना तेथे उपस्थित असलेले पोलीस अंमलदार नामे संदिप उर्फ समीर चाफले यांनी मध्यस्ती करुन त्यांना बिल देण्याबाबत समजाविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीतांनी सदर पो. अंमलदार सोबत वादविवाद केला व त्याचा राग धरुन आरोपी नामे यश अनिल समुंद यास फोन करुन बोलावुन घेवुन बार चे बाहेर निघाल्यावर आरोपीतांनी पो. अंमलदार संदीप उर्फ समीर चाफले व त्याचे सोबत असलेला पो. अं. दिलीप चव्हाण यांचेवर हल्ला करुन त्यांचे जवळील धारदार हत्याराने वार केले ज्यात पोलीस अंमलदार दिलीप सुभाष चव्हाण हे मरण पावले व संदीप उर्फ समीर चाफले हे गंभीर जखमी असल्याने त्यांचा खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरु आहे.


सदर प्रकरणी आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे कलम १०३ (१), १०९ (१), २९६, ३ (५) भारतीय न्याय संहिता-२०२३ अन्वये खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन गुन्हयातील आरोपी नामे (१) अक्षय उर्फ आकाश संजु शिर्के, वय २९ वर्ष, (२) यश अनिल समुंद वय २७ वर्ष व (३) नितेश हनुमान जाधव वय २९ वर्ष या तिन्ही आरोपीतांना तात्काळ अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील सखोल तपास वरिष्ठ अधिकारी श्री सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर हे करीत आहेत.